साई प्रणिथ उपांत्य फेरीत

0
99

न्यूझीलंड ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत साई प्रणिथच्या रुपात भारताचे आव्हान कायम असून काल शुक्रवारी त्याने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तिसर्‍या मानांकित प्रणिथने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत श्रीलंकेच्या निलुका करुणारत्ने याचे आव्हान २१-७, २१-९ असे सहज परतवून लावले. हा सामना केवळ २८ मिनिटे चालला. अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी त्याचा सामना इंडोनेशियाच्या द्वितीय मानांकित जोनाथन क्रिस्टी याच्याशी होणार आहे. अन्य भारतीयांमध्ये पाचव्या मानांकित समीर वर्माला दोनवेळच्या ऑलिम्पिक विजेत्या लिन डान याने ४० मिनिटांत २१-१९, २१-९ असे पराजित करत बाहेरचा रस्ता दाखविला. पुरुष दुहेरीतील भारताचे शेवटचे आशास्थान असलेल्या मनू अत्री व बी. सुमिथ रेड्डी यांची वाटचालदेखील काल खंडित झाली. चौथ्या मानांकित बोदिन इसारा व निपितफोन फुंआंगफुफेट या थायलंडच्या जोडीने भारतीय जोडीला २१-१०, २१-१५ असे सहज हरविले.