सांत आंद्रेत जोरदार प्रचार

0
98

सांत आंद्रेत आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक व दि. २२ मे रोजी पणजीत होणार्‍या ‘आप’च्या जाहीर सभेला उपस्थित राहण्यासाठी घरोघरी भेटी देण्यास सुरूवात केली आहे.

रापणकारांचा पाठिंबा
आप येत्या विधानसभा निवडणुकीत ४० ही जागा लढविणार आहे. यात सांत आंद्रे मतदारसंघाचाही समावेश आहे. या अनुषंगाने सांत आंद्रे मतदारसंघ विधानसभा निवडणूक व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कांपाल जाहीर सभेला या मतदारसंघातून जास्तीत जास्त जनसमूदाय उपस्थित करण्याची जबाबदारी आपचे रामा काणकोणकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. श्री. काणकोणकर यांनी या एकंदरीत कामासाठी टीम उभी करत कामाला जोमात सुरुवात केली आहे. आजोशी, मंडुर, नेवरा, आगशी व बांबोळी आदी भागात गाठीभेटीचे काम जोरात सुरू केले आहे. हल्लीच बांबोळी – पणजीपर्यंत काढलेल्या रॅलीला समर्थकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. या
भागातील रापणकारांनी आम
आदमीला ज़ोरदार पाठिंबा दिला आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी मच्छिमारी जाळी विणण्यात सहभाग घेतला. राज्यात आपचे सरकार का हवे? दिल्लीत ’आप’ने सरकार कसे घडविले याचा माहितीपटही ठिकठिकाणी दाखविण्यात आला. कांपाल येथील सभेनंतर परत विधानसभा निवडणूक प्रचारात कार्यकर्ते आपापल्या कामात गुंतणार आहेत.