सांगोल्डा येथील अपघातात दुचाकीचालक ठार; १ जखमी

0
17

सांगोल्डा येथे कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बागा-कळंगुट येथील दुचाकीचालक कपिल लमाणी (२५) याचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेल्या इसमाच्या उजव्या पायाला व शरीराच्या इतर भागांना दुखापत झाली.

साळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडला. टी. आर. मंजुनाथ रुद्रमूर्ती (३९) हा कळंगुटहून पर्वरीच्या दिशेने जात असताना तो आपल्या ताब्यातील इनोव्हा कार बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे चालवत होता. तो सांगोल्डा येथे पोहोचला असता दुभाजक ओलांडून कार विरुद्ध दिशेला जात समोरून येणार्‍या दुचाकीला धडक दिली.

या अपघातात गंभीर झालेल्या कपिल लमाणी याला बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात नेत असताना त्याचा वाटेत मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेला व्यंकटेश लमाणी (२३, रा. गदग कर्नाटक) हा जखमी झाला. त्याच्या उजव्या पायाला व शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक आतिकेश खेडेकर यांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी भादंसं कलमांंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.