सांगोल्डा पंचायतीचे उपसरपंच ठरले अपात्र

0
6

पंचायत निधीच्या गैरवापर प्रकरणी पंचायत संचालनालयाने सांगोल्डा पंचायतीचे उपसरपंच उल्हास मोरजकर यांना अपात्र ठरवले आहे. उल्हास मोरजकर यांच्यावर पंचायतीच्या बँक खात्यातून 16 लाख 10 हजार 926 रुपये एवढा निधी काढून त्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले असून, त्यांचे पंच सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. 19 मे 2026 पर्यंत ते पंच म्हणून अपात्र राहतील, असे पंचायत संचालनालयाने स्पष्ट केले आहे.