सहा पालिकांसाठी आणखी २४ अर्ज

0
79

राज्यातील सहा नगरपालिकांच्या २० मार्च २०२१ रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी आणखी २४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून पंचायत पोटनिवडणुकीसाठी आणखी २ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

डिचोली नगरपालिकेत ६ उमेदवारी अर्ज, वाळपईत २ उमेदवारी अर्ज, कुंकळ्ळी नगरपालिकेत १२ उमेदवारी अर्ज, कुडचडे-काकोडा नगरपालिकेत २ उमेदवारी अर्ज आणि काणकोण २ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. राज्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी आत्तापर्यंत एकूण ५० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी शिवोली आणि असोळणा पंचायतक्षेत्रात प्रत्येकी १ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. पंचायत पोटनिवडणुकीसाठी आत्तापर्यंत एकूण ६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी चार दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.
साखळी नगरपालिकेच्या प्रभाग ९ मधील पोट निवडणूक आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या नावेली मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अजूनपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही.