कोरोनावरील लशीसाठी असे नाव नोंदवा

0
90

>> कोविन पोर्टल’ व ‘आरोग्यसेतू’ ऍपवर नोंदणी सुरू

काल एक मार्चपासून देशभरात कोरोनावरील लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला. त्यात ६० वर्षे वयावरील व्यक्ती आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या आजारी व्यक्ती यांना कोरोनावरील लस देण्यास सुरूवात झाली आहे. ज्येष्ठ नागरिक व ४५ पेक्षा अधिक वयाच्या आजारी व्यक्तींना ही लस घेण्यासाठी नोंदणी करावी लागणार असून काल सकाळी नऊ वाजल्यापासून सुरूवात झाली.
कोरोनावरील लस घेण्यासाठी आपले नाव नोंदवण्यासाठी ुुु.लेुळप.र्सेीं.ळप ह्या ‘कोविन २.०’ पोर्टलवर किंवा मोबाईलवरील ‘आरोग्यसेतू’ ऍप वर नोंदणी करावी लागते.
प्रत्येक दिवसासाठीची नोंदणी सकाळी ९ वाजता सुरू होऊन संध्याकाळी ३ वाजता बंद होईल.

नोंदणी अशी करावी –
र्े www.cowin.gov.in ह्या संकेतस्थळावर लॉग ऑन करून आपला मोबाईल क्रमांक द्यावा.
र्े आपल्या मोबाईलवर एसएमएसद्वारे ओटीपी म्हणजे एकदाच वापरायचा पासवर्ड येईल.
र्े तो ओटीपी पोर्टलवर देऊन ‘व्हेरिफाय’ बटन दाबावे.
र्े ‘रजिस्ट्रेशन ऑफ व्हॅक्सिनेशन’ किंवा लशीची नोंदणी हे वेबपेज उघडेल.
र्े त्या वेबपेजवर आपली माहिती भरावी. आपले ओळखपत्र पुरावा म्हणून द्यावे.
र्े आपल्याला अन्य आजार आहेत का हेही आपल्याला विचारले जाईल. त्यावर हो किंवा नाही हे उत्तर द्यावे.
र्े नोंदणीसाठी माहिती भरली की ‘रजिस्टर’ बटनावर क्लीक करावे. नोंदणी पूर्ण होताच आपल्याला दुजोरा देणारा संदेश येईल.
र्े नोंदणी पूर्ण झाली की आपल्याला ‘अकांऊटस् डिटेल्स’ या भागात जाता येईल. ‘शेड्यूल युवर अपॉइंटमेंट’ म्हणजे अपॉइंटमेंट घ्या ह्या बटनावर क्लीक करून त्यावर आपल्याला कधी व कुठे लस घ्यायची आहे ही माहिती भरावी.
र्े एका मोबाईल क्रमांकाच्या आधारे जास्तीत जास्त चार जणांच्या लसीकरणासाठी नोंदणी करता येईल.
आरोग्यसेतूवरील नोंदणी ः
मोबाईलवरील ‘आरोग्यसेतू’ ऍपवर नोंदणी करण्यासाठी खास टॅब तयार करण्यात आले आहे. त्यात आपले नाव, वय आदी माहिती भरून लसीकरणासाठी नाव नोंदवता येऊ शकते.