राज्यात कोरोनाबाधित सापडण्याचे प्रमाण आता अल्प झाले असून काल मंगळवारी सलग पाचव्या दिवशी कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. काल मंगळवारी चोवीस तासांत ९ कोरोनाबाधित आढळून आले. तसेच १८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ८५ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३८३० एवढी आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन १२११ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.४० टक्क्यांवर पोहोचले आहे.