सर्वोच्च न्यायालयाकडून १० राजकीय पक्षांना दंड

0
61

>> उमेदवारांविरोधातील गुन्हे जाहीर न केल्याने कारवाई

सर्वोच्च न्यायालयाने एकूण १० राजकीय पक्षांना त्यांनी आपल उमेदवारांविरोधातील गुन्हे जाहीर न केल्याने दंड ठोठावला आहे.
राजकारणातील गुन्हेगारी संपवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात, राजकारणातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पावले उचलण्यासाठी अनेकदा आवाहन केले आहे. परंतु अजूनही राजकीय पक्षांची झोप उडालेली नाही.

न्यायालयाने अनेकदा आवाहन करूनही राजकीय पक्ष झोपेतून उठण्यास तयार नाहीत आणि न्यायालयाचे हात बांधलेले आहेत. हे कायदे मंडळाचे काम आहे. आम्ही फक्त आवाहन करू शकतो. राजकारणी जागे होतील आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी मोठी सर्जरी करतील अशी अपेक्षा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान, दंड ठोठावल्या पक्षात भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा १० पक्षांचा समावेश आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस ५ लाख, माकप ५ लाख, भाजप १ लाख, कॉंग्रेस १ लाख, भाकप १ लाख, बसपा १ लाख,
जेडीयू १ लाख, आरजेडी १ लाख, आरएलएसपी १ लाख आणि लोजपा १ लाख अशा प्रकारचा दंड या पक्षांचा ठोठावण्यात आला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या मुद्द्यांवरून सर्वोच्च न्यायालायने राजकीय पक्षांना हा दंड बजावला आहे.