सरपंच, पंचांचे मानधन गणेशचतुर्थीपूर्वी वितरित

0
23

राज्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, पंच सदस्यांचे प्रलंबित मानधन आगामी गणेश चतुर्थीपूर्वी वितरित केले जाणार आहे, असे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना येथे काल सांगितले. राज्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, पंच सदस्यांचे मानधन गेले वर्षभर प्रलंबित आहे. सरपंच, पंच सदस्य यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ लागल्याने मानधन प्रलंबित आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी मानधनाच्या विषयावर चर्चा करून तोडगा काढण्यात आला आहे, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.