महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर सरकार स्थापनेबाबत निर्माण झालेल्या तिढ्याला शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्रिपदाचा राजिनामा दिल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केला. समसमान मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झाला होता हा शिवसेनेचा दावा फडणवीस यांनी फेटाळला. आपल्या उपस्थितीत असा निर्णय उभय पक्षांनी कधीच घेतला नाही असेही त्यांनी सांगितले.
सरकार स्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी आपण उध्दव ठाकरे यांना अनेकदा फोन केला. मात्र ठाकरे यांनी आपले कॉल्स कधीच घेतले नाही असेही फडणवीस म्हणाले. भाजपबरोबर चर्चा न करता विरोधी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्याशी बोलणी करण्याचे शिवसेनेचे धोरण चुकीचे असल्याचा दावा फडणवीस यांनी केला.