सरकारी इस्पितळांत १ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

0
136

राज्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ काय’ असल्याने कोरोना ’हा’ारीची परिस्थिती खूपच गंभीर बनली आहे. राज्यातील सरकारी इस्पितळे कोरोना रुग्णांनी फुल्ल झाली आहेत. इस्पितळात कोरोना रुग्णांना खाट उपलब्ध होईपर्यंत स्ट्रेचरवर किंवा जमिनीवर ठेवावे लागत आहेत.

राज्यातील सरकारी इस्पितळांमध्ये १ हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये चारशे रुग्ण, दक्षिण गोवा इस्पितळात ३९५ रुग्ण, ईएसआय इस्पितळात १६० रुग्ण तसेच फोंंडा येथील उपजिल्हा इस्पितळात रुग्णांना दाखल करून घेण्याचे काम सुरू आहे.
रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने नवीन खाटा उपलब्ध कराव्या लागत आहेत. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात आणखीन १०० खाटांची सोय केली जात आहे. ईएसआय इस्पितळात आणखी खाटांची सोय करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

सुपर स्पेशलिटी इस्पितळात खाटांची सोय केली जात आहे. राज्यातील खासगी इस्पितळामध्ये कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.