कापसे-ते कोडोली येथील खनिज ट्रकांना चढउतार करण्याचा दर १४ रु. कि. मी. प्रती टन मिळत नाही, तोपर्यंत सेझा गोवा कंपनीचा खनिज माल चढउतार करणार नसल्याचा ठराव काल झालेल्या सेझा गोवा ट्रक मालकांच्या सभेत घेण्यात आल्याची माहिती सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर यांनी दिली. सावर्डे येथे झालेल्या या सभेत सुमारे ३०० हून अधिक ट्रकमालक उपस्थित होते. या ट्रक मालकांनी सह्यांची मोहीम सुरू केली असून हे सह्या केलेले निवेदन सरकार लगेच सेझा गोवा कंपनीला देणार असल्याचे आमदार पाऊसकर यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपूर्वी ट्रक मालकांची वाढीव दराची मागणी होती. त्यानंतर त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांकडे बैठका झाल्या. या बैठकीमध्ये चढउताराचा दर पहिल्या १० कि. मी. १२, १० ते २० कि. मी. १२.५० असा सरकारने ठरवला होता.
सरकार ट्रक मालकांबरोबर ः पाऊसकर
काल झालेल्या ट्रक मालकांच्या सावर्डेतील सभेत आमदार पाऊसकर यांनी सरकारने दिलेला हा दर ट्रक मालकांसमोर ठेवला. मात्र हा दर ट्रक मालकांना मान्य नसल्याचे आमदार पाऊसकर यांनी सांगितले. यावेळी बोलताना आमदार पाऊसकर यांनी सांगितले की, या आधी ५२ रु. डिझेल होते. ते आता ५८ रुपये झाले आहे. मात्र वाढीव थोड्या फार प्रमाणात वाढ देत सरकारने दर दिलेला आहे. मात्र तो ट्रक मालक मान्य करत नाहीत मात्र तरीही सरकार ट्रक मालकांबरोबर राहणार असल्याचे स्पष्ट केले.