राज्य सरकारच्या कार्मिक खात्याने एका आदेशान्वये पाच संयुक्त मामलेदारांच्या बदलीचा आदेश काल जारी केला. वर्षा परब यांची संयुक्त मामलेदार-४ बार्देश येथे बदली केली आहे. धीरेन बाणावलीकर यांच्या संयुक्त मामलेदार-३ बार्देश आणि संयुक्त मामलेदार-५ बार्देश या पदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. गौरव गावकर यांची संयुक्त मामलेदार-४ सासष्टी आणि संयुक्त मामलेदार-५ सासष्टीचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.
शमा नार्वेकर यांची संयुक्त मामलेदार-२ पेडणे आणि संयुक्त मामलेदार-३ पेडणेचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. प्रिया सामंत यांची संयुक्त मामलेदार-४ तिसवाडी आणि संयुक्त मामलेदार-५ तिसवाडीचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. सासष्टीचे संयुक्त मामलेदार-१ कृष्णा गावस यांनी सासष्टी संयुक्त मामलेदार-३ चा अतिरिक्त पदभार सांभाळावा, असे आदेशात म्हटले आहे.