मनीष सिसोदिया यांची ९ तास सीबीआय चौकशी

0
7

दिल्लीतील अबकारी घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सीबीआयच्या पथकाने काल तब्बल ९ तास चौकशी केली. तपास पथकाने या घोटाळ्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्नोत्तरे सिसोदिया यांना विचारली. मनीष सिसोदिया सकाळी ११.१५ वाजता दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात पोहोचले होते.

त्यानंतर सुमारे ९ तासांच्या चौकशीनंतर मनीष सिसोदिया रात्री ८ च्या सुमारास सीबीआय कार्यालयातून बाहेर पडले. या चौकशीनंतर सीबीआय कार्यालयातून बाहेर पडलेल्या सिसोदिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. चौकशीत घोटाळ्याचा काही मुद्दा नव्हता. हे संपूर्ण प्रकरण बनावट आहे. हे प्रकरण कोणत्याही तपासासाठी नसून, ऑपरेशन लोटस यशस्वी करण्यासाठी करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.