समुद्री पाणी वाढण्यासंदर्भात पर्यटकांना सावधगिरीचा इशारा

0
102

पणजी (प्रतिनिधी)
राज्यातील किनारी भागात लुबान या वादळामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने पर्यटन खात्याने पर्यटकांना सावधगिरीचा इशारा काल दिला आहे. येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत लुबान या वादळामुळे समुद्र किनार्‍यावरील पाण्याच्या पातळीत वाढण्याची शक्यता असल्याने पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी. पर्यटकांनी समुद्रकिनार्‍यावरील तैनात जीवरक्षकांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच समुद्र किनार्‍यावरील शॅक मालकांनी सुध्दा सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.