सनथ-देवनने रचला गोव्याच्या शालेय क्रिकेटमध्ये इतिहास

0
91

सनथ नेवगी आणि देवन चित्तम या भाटिकर मॉडेल इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गोव्याच्या शालेय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. काल मडगाव क्रिकेट क्लबच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या पॉश हायस्कूलविरुद्धच्या अंडर-१४ आंतर शालेय सामन्यात सनथ (१६९) आणि देवन (१३४) यांनी दमदार शतके नोंदवित पहिल्या विकेटसाठी ३४७ धावांची भागीदारी करीत विक्रम नोंदविला. त्यांच्या या विक्रमी खेळाच्या जोरावर भाटिकर मॉडेलने ४० षट्‌कांत ४ गडी गमावत ४०५ अशी विशाल धावसंख्या उभारली. कैफने २ तर मागराजने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात खेळताना पॉश इंग्लिश स्कूलचा संघ १७.२ षट्‌कांत केवळ ४२ धावांवर गारद झाला. सनथने २ धावांत ३, श्रेयने १२ धावांत २ तर रोहनने ८ धावांत १ गडी बाद केला.
सनथ आणि देवेन हे दोघेनही बोर्डा येथील साग केंद्रात माजी रणजीपटू हेमंत आंगले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत.