सत्तेवर आल्यानंतर ४८ तासांत मोफत वीज : राघव चढ्ढा

0
109

गोव्यात होणार असलेल्या पुढील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे सरकार जर सत्तेवर आले तर ४८ तासांच्या आत लोकांना मोफत वीज देण्यात येईल, असे आपचे नवी दिल्लीतील आमदार राघव चढ्ढा यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. नवी दिल्लीत आम्ही २०० युनिटपर्यंतची वीज वापरणार्‍या ग्राहकांना मोफत वीज पुरवीत असतो. तर ४०० युनिटपर्यंतची वीज वापरणार्‍यांच्या वीज बिलात ५० टक्के एवढी सूट देत असतो, असे चढ्ढा म्हणाले.

सत्तेवर आल्यास आम्ही गोव्यातही २०० युनिटपर्यंतची वीज वापरणार्‍यांना मोफत वीज तर ४०० युनिटपर्यंतची वीज वापर्‍यांना बिलात ५० टक्के सूट देऊ. आचार संहितेसाठी पक्षाने आपले वीज आंदोलन तात्पुरते रद्द केले आहेत. मात्र, जानेवारी महिन्यात नव्याने हे वीज आंदोलन सुरू करणार असल्याचे चढ्ढा म्हणाले.