सचिन, रेखा, हेमा मालिनीसोबत अडवाणी संसदीय समितीवर

0
97

भाजपचे नवोदित खासदार अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय समितीवर सरकारने क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रेखा, जया बच्चन, हेमा मालिनी, वरूण गांधी, तृणमूलचे डेरेक ओब्रायन यांच्याबरोबरच भाजपचे ज्येेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ८६ वर्षीय अडवाणी वय, अनुभवाने समितीत ज्येष्ठ आहेत. यूपीए सरकारच्या काळात अडवाणींना गृह समितीवर घेतले होते. दरम्यान, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी वित्तविषयक समितीवर सदस्य बनविले आहे. समितीचे अध्यक्षपद कॉंग्रेस खासदार वीरप्पा मोईलींना दिले आहे.
नव्याने गठीत २४ पैकी ५ समितींचे अध्यक्षपद कॉंग्रेसकडे आहे. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे भारतीय विदेश सेवेतील माजी अधिकारी खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील विदेश व्यवहार समितीत आहेत. ९० सालापासून लोकप्रिय बनलेल्या संसदीय समित्या या ‘मिनी संसद’ गणल्या जातात.