सचिन तेंडुलकरचा ग्रेटर नोएडात आलिशान फ्लॅट

0
82

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आता नोएडा येथे सहा बेडरुम्सचा आलिशान फ्लॅट घेतला आहे. हल्लीच सचिनची पत्नी अंजली तेंडुलकरच्या नावावर या फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झाले आहे. ग्रेटर नॉएडातील जेपी रिसॉर्टच्या क्रिसेंट कोर्टमधील या २१व्या मजल्यावरील या फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनसाठी स्टँप डयुटी जवळजवळ रु. ८.४० लाख असून किंमत जवळ जव( १ कोटी ६८ लाख सांगितली जाते. सहा वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकर जेपी सिमेंट कंपनीचा ब्रँड अँबासेडर होता आणि कंपनीसाबेत झालेल्या करारानुसार त्याला फ्लँट देण्यात आलेला आहे. सचिनने तो पन्नीच्या नवावर ट्रान्स्फर केलेला आहे. माजी भारतीय कसोटीपटू कपिल देव आणि रुद्र प्रताप सिंह यांचेही फ्लॅटस या अपार्टमेंटसमध्ये आहेत.