राज्यात चोवीस तासांत आणखीन 197 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात नवीन 10 कोरोनाबाधित आढळून आले असून, सक्रिय रुग्णसंख्या 201 वर आली आहे. राज्यात नवीन बाधित आढळून येण्याचे प्रमाण 5 टक्के एवढे आहे. तसेच चोवीस तासांत 3 रुग्णांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले असून, 24 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.