संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात होणार आहे. २० दिवसांचे प्रत्यक्ष कामकाज या कालावधीत होणार आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज हे एकाच वेळी कोरोनाविषयक नियमांचे पालन करून होणार आहे.
कोरोना संक्रमण काळामुळे गेले दीड वर्ष संसदीय अधिवेशन हे निर्धारित पूर्ण वेळेत घेता आले नव्हते. गेल्या वर्षीचे हिवाळी अधिवेशन करोनोच्या लाटेमुळे घेताच आले नव्हते. त्यानंतर झालेली अर्थसंकल्पीय आणि पावसाळी अधिवेशने ही कमी कालावधीची ठरली होती. त्यानंतर आता संसदेच्या कामकाज सल्लागार समितीने हिवाळी अधिवेशनाचे वेळापत्रक हे जाहीर केले आहे.
मागील पावसाळी अधिवेशन हे पेगासस प्रकरण नव्या कृषी कायद्यांवरुन गाजले होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यातील विविध घडामोडी लक्षात घेता आगामी हिवाळी अधिवेशन हे वादळी ठरणार यात शंका नाही.