संशयितांना चार-पाच दिवसांत गजाआड करणार ः मुख्यमंत्री

0
68

>> मडकईतील धार्मिक प्रतिकांची तोडफोड

करंजाळ – मडकई येथील ख्रिस्ती दफनभूमितील १२ क्रॉसची मोडतोड प्रकरणातील संशयितांचा पोलिसांना सुगावा लागला असून पुढील चार ते पाच दिवसात संशयितांना अटक होऊ शकेल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत विरोधी नेते बाबू कवळेकर यांच्या लक्षवेधी सुचनेवर उत्तर देताना सांगितले.
कुडचडे येथे अटक केलेल्या फ्रान्सिस परेराने आपण केलेल्या सर्व कृत्यांची म्हणजे १४६ प्रकरणांची माहिती पोलिसांना दिली आहे. त्याची प्रेरणा घेऊन अन्य लोकही अशी कृत्ये करण्यास पुढे आले असावेत. त्यात राजकारणही असू शकते, असा संशय पर्रीकर यांनी व्यक्त केला.
कोणत्याही परिस्थितीत वरील प्रकार बंद झाले पाहिजेत, असे कवळेकर यांनी सांगितले. कुडचडे येथील परेरा याला अटक केल्यानंतर राज्यातील सर्व क्रॉस तोडफोडीचे काम एका व्यक्तीकडून होणे कठीण असल्याचे मत आपण यापूर्वीच व्यक्त केले होते. करंजाळ येथे घडलेल्या घटनांमुळे ते खरे ठरल्याचे कवळेकर म्हणाले.