संयुक्त पुरोगामी आघाडीचा अध्यक्ष होण्यात आपल्याला कोणतेही स्वारस्य नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल दिले.
कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या जागी संपुआच्या अध्यक्षपदी त्यांची निवड होण्याची जी शक्यता वर्तवली जात आहे, त्या संदर्भात पवार यांनी हा खुलासा केला. पवार शेतकरी आंदोलनाच्या प्रश्नी विरोधी नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत जाणार आहेत.
संयुक्त पुरोगामी आघाडीचा अध्यक्ष होण्याची आपल्याला इच्छा नाही व वेळही नाही असे पवार यांनी सांगितले. तशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.