Home Featured संजना व संजय वेळीप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

संजना व संजय वेळीप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0

भाजपच्या माजी दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष, राज्य सचिव व सध्याच्या गिरदोलीच्या जिल्हा पंचायत सदस्य संजना वेळीप व त्यांचे पती आणि भाजप सदस्य संजय वेळीप यांनी काल भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
विरोधी पक्ष नेते व कुंकळ्ळी मतदारसंघाचे आमदार युरी आलेमाव व कुंकळ्ळीचे गट काँग्रेस अध्यक्ष आसिझ नोरोन्हा यांच्या हजेरीत उभयतांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दोघानीही वैयक्तिक कारणांवरून भाजपला रामराम ठोकला. यावेळी बोलताना युरी आलेमाव यांनी, संजना वेळीप व संजय वेळीप यांच्या काँग्रेस प्रवेशाने काँग्रेस पक्षाचा फायदा होणार असून पक्ष बळकटीसाठी मदत होणार आहे.
गोवा वाचवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा, असे आवाहन केले.