>> दुसरी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
केंद्रीय आयुष मंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण खाली गेल्याने त्यांना पुढील तीन दिवस हाय फ्लो ऑक्सिजनवर ठेवण्याचा निर्णय त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी घेतला आहे. तीन दिवसांनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यास त्यांना सामान्य प्राणवायू पुरवठ्यावर ठेवण्यात येणार आहे.
श्रीपाद नाईक यांचा कोरोनासाठीच्या आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रविवारी करण्यात आलेल्या अँटिजेन चाचणीत त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. येत्या एक अथवा दोन दिवसांत पुन्हा एकदा त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. श्रीपाद नाईक यांना १४ ऑगस्ट रोजी ते कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोनापावला येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते.