श्रीनगरमधील दहशतवादी हल्ल्यात ३ पोलीस मृत्यूमुखी

0
79

दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये काल केलेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये तीन पोलीस मृत्यूमुखी पडले. झाडीबाल या ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात दोन पोलिसांचा बळी गेला. तेथे अशा प्रकारचा झालेला हा पहिलाच हल्ला आहे. तेंगपोरा येथील दुसर्‍या हल्ल्यात महम्मद शङ्गी चटवाल हा पोलीस अधिकारी ठार झाला. या हल्ल्यांची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.

चटवाल ठार झाल्यानंतर त्यांचे रिव्हॉल्व्हरी पळवले. झाडीबाल या ठिकाणी दहशतवाद्यांनी पोलीस स्थानकापासून २०० मीटर अंतरावरून हल्ला चढवला. त्यावेळी दोन पोलिसांवर त्यांनी गोळ्यांची भडीमार केला. गंभीर स्थितीत त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांआधीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. सहायक पोलीस उपनिरीक्षक नझीर अहमद व कॉन्स्टेबल बशीर अहमद अशी त्यांची नावे आहेत.
या हल्ल्यावेळी उभय पोलिसांकडे शस्त्रे नव्हती. त्यामुळे दहशतवाद्यांवर प्रतीहल्ला करणे त्यांना शक्य झाले नाही.