केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शिरोमणी अकाली दलाच्या नेतृत्वाखाली काल शुक्रवारी संसदेपर्यंत एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, दिल्ली पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग उभारत रस्ते बंद करून आंदोलकांचा मार्ग रोखून धरला. कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आले असल्याचेही पोलिसांनी सांगितले. यावर आंदोलकांनी पोलिसांची ही कारवाई म्हणजे अघोषित आणीबाणी असल्याची टीका केली आहे.
गुरुद्वारा रकाब गंज साहीब परिसरातून शिरोमणी अकाली दलाच्या आंदोलनाला सुरूवात होणार होती. मात्र, या भागाला घेराव घालत पोलिसांनी आंदोलकांना रोखले. दिल्लीत अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.