शेतकरी 6 रोजी दिल्लीकडे निघणार

0
3

10 रोजी देशभरातील रेल्वेगाड्या थांबवणार

पंजाब-हरियाणाच्या शंभू-खनौरी सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी बुधवार 6 मार्च रोजी दिल्लीकडे कूच करणार आहेत. 10 मार्च रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत देशभरातील रेल्वे गाड्याही थांबवण्यात येणार आहेत असे शेतकऱ्यांच्या नेत्यांनी सांगितले. काल रविवारी 3 मार्च रोजी भटिंडा येथे शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी मंचावरून ही घोषणा केली.

पंजाबमधील किसान मजदूर मोर्चा आणि युनायटेड किसान मोर्चाचे नेते पंढेर यांनी, 6 मार्चला हरियाणा-पंजाब वगळता इतर राज्यातील शेतकरी आपापल्या मार्गाने दिल्लीत पोहोचतील. मग ते ट्रेनने येतील किंवा पायी येतील. सरकारचे म्हणणे आहे की शेतकरी ट्रेन-बसने दिल्लीला पोहोचू शकतात, तर बिहार-कर्नाटकमधून दिल्लीला जाणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ट्रेनमधून अटक केली. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्रॉलीशिवायही दिल्लीत येऊ द्यायचे आहे की नाही हे 6 मार्चच्या मोर्चामुळे स्पष्ट होईल.

पंढेर पुढे म्हणाले की, आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही आंदोलनात ड्रोनचा वापर झालेला नाही. सरकारने ड्रोनचा वापर करून बाहेरून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सरकारने हरियाणा-पंजाबच्या सीमांवर तारा लावलेल्या आहेत,
शेतकरी शुभकरणच्या शवचिकित्सा अहवालामध्ये मोठा खुलासा झाला आहे. त्याच्या डोक्यावर धातूचे काही तुकडे आढळून आले आहेत. जे खऱ्या बुलेटशी जोडले जात आहेत. पंजाब पोलिसांनी हा अहवाल हरियाणा पोलिसांना पाठवला आहे.
दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने 14 मार्चला दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.