शेतकरी नेत्यांच्या हट्टामुळे तोडगा निघत नाही ः तोमर

0
195

नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन आता थांबवावे असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहे. सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. प्रत्येक गोष्ट ऐकून घ्यायची तयारी केली आहे मात्र शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या हट्टापायी कोणताही तोडगा निघत नाही असे कृषिमंत्री तोमर म्हणाले.

आम्ही कृषी कायदे स्थगित ठेवण्याचा प्रस्तावही शेतकर्‍यांसमोर ठेवला होता मात्र ती मागणीही या नेत्यांनी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता शेतकर्‍यांनीच सरकारला प्रस्ताव द्यावा असे तोमर म्हणाले.
यावेळी बोलताना कृषिमंत्री तोमर यांनी पुन्हा एकदा, नवीन कृषी कायदे हे शेतकर्‍यांच्या हिताचे आहेत. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे यासाठीच ते आणण्यात आले आहेत. यात शेतकर्‍यांना कोणताही कर भरावा लागणार नाही ही शेतकर्‍यांच्या हिताची गोष्ट आहे. मात्र नेते हे समजूनच घेत नाहीत असे सांगितले.

शेतकरी व केंद्र सरकार यांच्या दरम्यान, एक समिती तयार करून तीफायद्या-तोट्याचा विचार करून काम करेल अशी भूमिकाही सरकारने घेतली. आम्ही आंदोलकांचा सन्मानही राखला आहे. मात्र काही नेते हट्टालाच पेटले असून त्यांना कोणाचेच ऐकायचे नाही. त्यामुळे यावर अद्याप कोणताच तोडगा निघालेला नाही असे तोमर म्हणाले.