सिडनी थंडर्स व मेलबर्न स्टार्स यांच्यातील लढतीत शिवीगाळ केल्याप्रकरणी स्टार्सचा लेगस्पिन गोलंदाज ऍडम झॅम्पा याच्यावर एका सामन्यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. २५०० ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंडदेखील त्याला ठोठावण्यात आला आहे. सिडनी थंडर्स संघाचा डाव सुरू असताना झॅम्पा डावातील १६वे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकातील एका चेंडूवर सिडनीच्या कॅल्लम फर्ग्युसनने साधारण शॉट मारला आणि एक धाव घेण्यासाठी पळाला. तेवढ्यात मेलबर्न स्टार्स संघातील एका खेळाडूच्या हातून त्याचा चेंडू सुटला आणि चौकार गेला. त्यामुळे झॅम्पाला राग अनावर झाला आणि त्याने रागात मैदानावर आपल्याच सहकार्याला शिवी दिली.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याविषयी माहिती देताना सांगितले की, झॅम्पा याने मेलबर्न स्टार्स विरुद्ध सिडनी थंडर्स संघात २९ डिसेंबर रोजी झालेल्या सामन्यात अपशब्द वापरले होते, जे स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झाले आहेत. त्यानंतर झम्पाने त्याची चूक मान्य केली आहे. त्यामुळे त्याला केवळ एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. निलंबनामुळे तो २ जानेवारी रोजी होबाट हरिकेन्सविरुद्ध होणार्या सामन्याला मुकणार आहे. या २८ वर्षीय लेग-स्पिनरने बिग बॅश लीगच्या दहाव्या हंगामापर्यंत आतापर्यंत ७ बळी घेतले आहेत. तो या हंगामात