शिवसेनेला १० मंत्रीपदांची ऑफर

0
70

महाराष्ट्रात शिवसेनेला सरकारात सामील करून घेण्यासाठी भाजपने वाटाघाटी सुरू केल्या असून, सेनेला पाच कॅबिनेट व पाच राज्यमंत्रीपदे देऊ केली असल्याचे कळते. भाजपचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि फडणवीस सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल मातोश्रीवर जाऊन शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व सत्ता वाटपाविषयी बोलणी सुरू केली.महाराष्ट्र अधिवेशन ८ डिसेंबरला सुरू होत असून त्याआधी ३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे.