वाळपईत दिवसाढवळ्या घरफोडी

0
95

वाळपई वेळूस येथे काल घरात कोणीही नसल्याचे ते पाहून दिवसाढवळ्या शामसुंदर शिरोडकर यांच्या घरात घरफोडी करून सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्याची घटना घडली.शामसुंदर हे सकाळी १० वाजता आपल्या बाजारातील दुकानात गेले होते. परत दीड वाजता घरी आले. तेव्हा घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप फोडले होते. त्यांची पत्नी नोकरीला जात असल्याने घराला कुलूप होते. चोरांनी घराचा मुख्य दरवाजा खोलून आत शिरले व कपाटातील सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, कानातील रिंग व केसातील वेणी असे दागिने लंपास केले शामसुंदर याने वाळपई पोलीस स्थानकात तक्रार केली.
वाळपई पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. श्‍वानपथक आणून तपास केला. मात्र सुगावा लागू शकला नाही. अधिक तपास वाळपई पोलीस करीत आहेत.