शिवसेना – शिंदे गटाच्या याचिकेवर ३ रोजी सुनावणी

0
19

शिवसेना पक्षावर कोणाचा दावा खरा आहे, हे पाहण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला नोटीस बजावली होती. निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती, मात्र आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत महत्त्वाची सुनावणी आता ३ ऑगस्टला होणार आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी होणार आहे. दोन्ही बाजूंनी शपथपत्र दाखल झाले आहे.