शिवपाल, अमरसिंहना सोडू शकत नाही ः मुलायमसिंह

0
116

>> अखिलेशना मुख्यमंत्रीपदावरून हटवणार नाही

 

उत्तर प्रदेशातील सत्ताधारी समाजवादी पक्षातील गृहकलह उङ्गाळल्याने बोलावलेल्या तातडीच्या कार्यकारिणी बैठकीत सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी पुत्र अखिलेश यादव यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविणार नसल्याचे स्पष्ट करतानाच भाऊ शिवपाल यादव व नेते अमरसिंह यांची साथही सोडणार नसल्याचे जोरदारपणे सांगितले.
मुख्यमंत्री अखिलेश यादव व शिवपाल यादव यांच्यातील पराकोटीच्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर काल सपाची बैठक घेण्यात आली. बैठकीत मुलायमसिंह यांनी वरील स्पष्टीकरण केल्यानंतर उभयतांची गळाभेट घडविल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची व धक्काबुक्कीही झाल्याचे सांगण्यात आले.
सपाच्या वाटचालीत भाऊ शिवपाल यादव यांचे योगदान भरीव असून अमरसिंह यांनी आपल्याला संकटातून वाचविले आहे. यामुळे आपण त्या दोघांची साथ सोडणार नाही असे मुलायम यांनी बैठकीत सुनावले. गृहकलहामुळे आपण व्यथित आहे. मात्र आपल्याला कोणी कुमकुवत समजू नये. पक्षासमोरील आव्हानांचा सामना करण्याऐवजी आपण आपसात भांड आहोत ही दुःखाची बाब आहे. जी राजकीय व्यक्ती टीका सहन करू शकत नाही तो कधीच मोठा नेता बनू शकत नाही अशी टिप्पणी त्यांनी अखिलेश यांना उद्देशून केली. सत्तेची हवा तुमच्या डोक्यात गेली आहे असे सुनावताना तरुणाई आपल्यासोबत नाही असा समज करून घेऊ नका असेही ते
म्हणाले.