>> दसरा मेळाव्याला उच्च न्यायालयाची परवानगी
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटाच्यादृष्टीने प्रतिष्ठेच्या झालेल्या दसरा मेळाव्याच्या लढाईत उद्धव ठाकरे गटाची सरशी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी शिवसेनेच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीअंती शिवाजी पार्कवर अर्थात शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास हिरवा कंदील दाखवला.
मुंबई महापालिकेने शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांनाही शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी नाकारली होती. त्यानंतर शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर शुक्रवारी उच्च न्यायालयात जवळपास साडेतीन तास युक्तिवाद झाला. शिवसेना, पालिका आणि शिंदे गटाच्या वकिलांकडून आपापली बाजू मांडली. त्यानंतर उच्च न्यायालयाने पालिकेचा निर्णय योग्य, उचित नाही, असा शेरा मारत ठाकरेंना दसरा मेळाव्याला परवानगी दिली.