Home बातम्या शाळांतून विद्यार्थिनींनास्व-संरक्षण प्रशिक्षण

शाळांतून विद्यार्थिनींनास्व-संरक्षण प्रशिक्षण

0

राज्यातील शाळांमधील शारीरिक शिक्षकाकडून विद्यार्थिनींना स्व-संरक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे. शारीरिक शिक्षकांना स्व-संरक्षणाचे खास प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य विधानसभेत पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या खासगी ठरावाला उत्तर देताना दिली. पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी एका खासगी ठरावाद्वारे राज्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना शालेय अभ्यासक्रमाअंतर्गत स्व-संरक्षण प्रशिक्षण देण्याची मागणी केली होती.