>> शिक्षण संचालकांचा आदेश
राज्यातील सरकारी, अनुदानित, विना अनुदानित शाळांच्या प्रमुखांनी केवळ ३३ टक्के कर्मचारी घेऊन काम करावे, असा आदेश शिक्षण संचालकांनी जारी केला आहे. हा आदेश ३ मे २०२० पर्यत लागू राहणार आहे. या काळात कर्मचार्यांना आलटून पालटून कामावर बोलावण्याची सूचना करण्यात आली आहे. शाळेत न येणार्या कर्मचार्यांना घरातून कामकाज करण्याची सूचना करावी असेही कळवण्यात आले आहे.
शिक्षण खात्याने शाळांतील कर्मचार्यांना सकाळी ८ ते १२, ८.३० ते १२.३० आणि ९ ते १ अशी तीन पाळ्यांत कामावर बोलाविण्याची सूचना केली आहे. विद्यार्थी, पालक व इतरांनी शाळेत जाऊ नये, असेही आदेशात म्हटले आहे.
शिक्षण खात्याची विभागीय कार्यालये कमीत कमी कर्मचार्यांसह सुरू करावीत. खात्यातील अ आणि ब गटातील सर्व अधिकार्यांनी कार्यालयात उपस्थिती लावावी. क गट आणि खालील ३३ टक्के कर्मचार्यांनी उपस्थिती लावावी, असे आदेशात म्हटले आहे.