शार्जील इमाम याला बिहारात पोलिसांकडून अटक

0
134

येथील शाहीन बाग येथे देशविरोधी प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी सीएए विरोधी चळवळीतील कार्यकर्ता शार्जील इमाम याला काल बिहारमधील जेहानाबाद येथे अटक केल्याची माहिती बिहारचे पोलीस प्रमुख गुप्तेश्‍वर पांडे यांनी दिली. नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा शार्जील इमाम हा पीएचडी करणारा विद्यार्थी असून उत्तर प्रदेश, आसाम, मणीपूर, अरूणाचल प्रदेश पोलिसांनाही तो हवा आहे. काल त्याला जेहानाबादमधील त्याच्या काको या मूळ गावी अटक करण्यात आली. त्याला येथील न्यायालयासमोर उभे करून रिमांड घेण्यात येणार आहे. इमाम हा मुंबई आयआयटीचा संगणक शाखेचा पदवीधर आहे. त्याने पीएचडीसाठी जेएनयूत प्रवेश घेतला आहे. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद झाला आहे.