माजी मंत्री व्हिक्टोरिया फर्नांडिस यांच्या पार्थिवावर काल शासकीय इतमामात सांताक्रुझ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री मायकल लोबो, खासदार विनय तेंडुलकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, खासदार फ्रान्सिस सार्दिन, आमदार चर्चिल आलेमाव, माजी आमदार तोमाझीन कार्दोज, माजी मंत्री जुझे डिसोझा, तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी माजी मंत्री फर्नांडिस यांना श्रद्धांजली अर्पण केली.