व्यास तळघरातील पूजा सुरुच राहणार

0
4

>> ज्ञानवापी मशीद समितीची याचिका हायकोर्टाने फेटाळली

गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या ज्ञानवापी मशीद प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात काल सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने ज्ञानवापीच्या व्यास तळघरातील पूजला स्थगिती द्यावी, ही मशीद व्यवस्थापन समितीची मागणी फेटाळून लावली. यासंदर्भात आधी जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती; मात्र त्यावेळी उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.

31 जानेवारी रोजी वाराणसीतील जिल्हा सत्र न्यायालयाने मशिदीच्या व्यास तळघरात पूजा करण्यास परवानगी दिली. भारतीय पुरातत्व खात्याने मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर होते, असा निर्वाळा दिल्यानंतर त्या आधारावर जिल्हा सत्र न्यायालयाने तिथे पूजा करण्यास परवानगी दिली. या निर्णयाला मशीद समितीने थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पूजेची परवानगी देण्याच्या निर्णयावर स्थगिती आणण्याची मागणी याचिकेत केली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने आधी उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले होते.