राज्य सरकारने कोविड-19 या महामारीच्या काळात असंघटित क्षेत्रातील व्यावसायिकांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यासाठी जाहीर केलेली योजना आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंबंधीची सूचना समाजकल्याण खात्याच्या संचालिका संध्या कामत यांनी जारी केली आहे. या योजनेखाली समाजकल्याण खात्याकडे सुमारे 90 हजार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सरकारकडून या योजनेसाठी 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे चाळीस हजारांच्या आसपास अर्ज निकालात काढण्यात आले आहेत. या योजनेखालील प्रलंबित अर्ज लवकरच निकालात काढण्यात येणार आहेत, असे सूचनेत म्हटले आहे.
कोविड महामारीच्या काळात स्थानिक छोट्या व्यावसायिकांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागले होते. त्यामुळे राज्य सरकारने स्थानिक व्यावसायिकांना 5,000 रुपयांची एकरकमी आर्थिक मदत जाहीर केली होती.