लक्ष्मीकांत पार्सेकर व अन्य संबंधित मंत्री, अधिकार्यांची बैठक घेत राज्यात राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियान योजनेचा आढावा घेतला व संपूर्ण गोवा स्वच्छ ठेवण्याच्या हेतूने राज्यातील महामार्ग व अन्य भागात मिळून शंभर सामाजिक शौचालय प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली. त्याचप्रमाणे पणजी स्मार्ट सीटी प्रकल्पाचाही आढावा घेतल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. जमिनीच्या वादामुळे काही घरांना शौचालय सुविधा तयार करणे कठीण होते. त्यामुळे अशा कुटुबांची सोय व्हावी म्हणूनच वरील शौचालय उभारण्याचा प्रस्ताव पुढे आणल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. बांधकाम स्थळांवर उघड्यावर शौचास जाण्याचे प्रकार होतात, असे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले असता, संबंधित कंत्राटदारांनी ही सुविधा उपलब्ध करून देणे सक्तीचे आहे. परंतु कंत्राटदार या नियमांचे पालन करीत नसतात, असेही ते म्हणाले. श्री. नायडू यांनी साळगाव येथे जाऊन आधुनिक कचरा प्रक्रियाची पहाणी केली. हा प्रकल्प पाहून नायडू यांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती पार्सेकर यांनी काल पत्रकारांना दिली.