मडगाव (न. प्र.)
कोलवा पोलिसांनी वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणलेल्या दोघा तरूणींची सुटका करून एक महिला व एका दलालाला अटक केली. कोलवा येथे पार्किंगच्या जागी काल रात्री ग्राहकांची सदर महिला अनिता रामदास भिसे (४५, महाराष्ट्र) व आझाद हुसेन खान (मालभाट, मडगाव) वाट पहात होते. यावेळी त्यांच्यासोबत दोन तरूणी होत्या. कोलवा पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी छापा टाकला व दोघा तरूणींची सुटका केली. तसेच सदर महिला व दलालाला कोर्टात सादर करताच कोर्टाने १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.