वेर्ला- काणकात रॉय फर्नांडिस यांना मारहाण केल्याची तक्रार

0
77

माहिती हक्क आयोगाचे कार्यकर्ते रॉय फर्नांडिस तसेच त्यांच्या अन्य दोन साथीदारांना वेर्ला-काणकातील रस्त्यात अडवून रोहन हरमलकर व साथींनी जबर मारहाण केल्याची तक्रार हणजूण पोलिसांत दाखल केली आहे. या तक्रारीनुसार संशयित मारेकर्‍यांच्या शोधात पोलीस पथक पाठवलल्याची माहिती निरीक्षक सुरज गावस यांनी दिली. रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या मारहाण प्रकरणामागे हल्लीच वेर्ला काणकात झालेले बेकायदा जमीन सपाटीकरण असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. संशयित आरोपी रोहन हरमलकर व त्याच्या चार साथीदारांनी फनार्र्ंडिस यांचे कर्मचारी अनिस अहमद यांना मारहाण करून त्यांना पांढर्‍या कारमध्ये कोंबून वेर्ला काणकातील रॉय फर्नांडिस यांच्या घरी नेले. तसेच यावेळी रॉय फर्नांडिस व इमान्युअल डिसोझा यांनाही रस्त्यातच अडवून हरमलकर व साथींनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.