वेर्णा येथील गोवा मोटर्स यांच्या शोरुममागे गवताला आग लागून येथे ठेवण्यात आलेल्या चार चाकी वाहनांच्या भंगाराने पेट घेतल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. वेर्णा अग्नीशामक दलाने त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवल्याने या शोरुमच्या सर्विस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी ठेवलेल्या चार वाहनांसहीत वीस लाख रुपयांची मालमत्ता बचावली. वेर्णा अग्नीशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार काल दुपारी २ वा. सदर आगीची घटना घडली. वास्को व मडगाव अग्नीशामक दलाच्या बंबांनाही घटनास्थळावर पाचारण करावे लागले. आग सर्विस सेंटरमध्ये पसरण्यापूर्वी ती विझवण्यात आल्याने चार दुरुस्तीसाठी आणलेली वाहने सुखरुप बचावली.