अध्यक्ष – उपाध्यक्षाबाबत लवकरच निर्णय

0
99

जिल्हा पंचायत
जिल्हा पंचायतींच्या अध्यक्ष – उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार यावर सध्या चर्चा चालू आहे. उद्या किंवा परवा युतीच्या घकांबरोबर यासंबंधीची चर्चा करून उत्तर गोवा व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींच्या अध्यक्ष – उपाध्यक्ष कोण असावे, यावर निर्णय घेणार असल्याचे प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सांगितले. यावेळी प्रथमच वरील निवडणुका पक्षीय पातळीवर घेतल्या असल्याने अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवडही पक्षीय पातळीवर केली जाईल. प्रत्यक्षात जिल्हा पंचायतीच्या सदस्यांनी हा निर्णय घ्यायचा असला तरी पक्षाचा आदेश याबाबतीत महत्वाचे आहे. या निवडणुकीत भाजपला काठावरचे बहुमत प्राप्त झालेले आहे. यावेळी मगोने महत्वाची कामगिरी बजावल्याने भाजपच्या काही नेत्यांचे मनसुबे विरले आहेत. त्यामुळे मगोच्या वाट्याला काय येईल हे उद्याच्या बैठकीनंतरच स्पष्ट होऊ शकेल.