वेडाच्या भरात पत्नीचा पतीकडून नेरूलमध्ये खून

0
97

नेरूल तिठ्यार येथील एका वयस्क इसमाने काल सकाळी आपल्या पत्नीच्या पोटात सुरा खुपसून खून केल्याचा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेरुल येथील यशवंत पेडणेकर (७२) याने वेड्याच्या भरात आपली पत्नी सुमन पेडणेकर(६५) हिच्या पोटात स्वयंपाक घरातील सुरा खुपसून तिला जखमी केले. अचानक घडलेल्या या प्रकाराने पत्नीने किंचाळी मारली. तिला कांदोळी येथील रुग्णालयात नेण्यात आले परंतु अधिक रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी निदान केले.