वीज यंत्रणेत बिघाडामुळे तिसवाडीचा पुरवठा ठप्प

0
93

काल वीज यंत्रणेतील बिघाडामुळे तिसवाडी तालुक्याला खंडित विजेचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. पणजी ते जुने गोवेपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असताना विजेच्या केबल्सना हानी पोचल्याने तसेच थिवी येथील १० केव्ही वीज वाहिनीत बिघाडामुळे खंडित विजेला सामोरे जावे लागले.
दुरुस्तीसाठी वीज खात्याला लोड शेडिंग करावे लागले. दरम्यान, आजही दुरुस्ती होणार असून लोड शेडिंगची शक्यता आहे.