उत्तर गोव्यातील कांदोळी येथील समुद्र किनार्यावर वीज कोसळल्याने एका देशी पर्यटकाचा मृत्यू झाला. तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य नागपाल (३५ वर्षे, नवी दिल्ली) असे मृत देशी पर्यटकाचे नाव आहे. चैतन्य हा पत्नीसमवेत सुट्टीवर गोव्यात आला होता. कांदोळी येथील समुद्र किनार्यावर असताना दिल्लीच्या नागपाल दाम्पत्यावर वीज कोसळली. चैतन्य नागपाल यांचे जागीच निधन झाले. त्याच्या पत्नीला उपचारार्थ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.