वीजप्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांकडून समर्थन

0
218

४०० केव्ही वीजवाहिनी प्रकल्पाचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जोरदार समर्थन केले. भाजप महिला मोर्चाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी जर पुढील वर्षापर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही तर राज्यात ४ ते ५ तास वीजसेवा खंडित करावी लागेल असा इशारा यावेळी दिला. खंडित विजेची समस्या दूर करण्यासाठी हा प्रकल्प उभारला जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. वनक्षेत्रातील झाडे कापणे आपल्यालाही आवडत नाही पण विकासासाठी मनाविरुद्ध काही निर्णय घ्यावे लागतात असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दरम्यान, खाण अवलंबितांनी बँकांकडून जी कर्जे घेतली होती, त्यांच्यासाठी खाणी बंद पडल्याच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने जी योजना तयार केली होती, त्या योजनेचा कालावधी ३१ मार्च २०२१ पर्यंत सरकारने एका अधिसूचनेद्वारे वाढवला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.